Current President
पं.विजय श्रीकृष्ण जकातदार सिव्हील इंजिनिर रिझर्व्ह बँकेतून असि. मनेजर टेक्निकल या पदावरून निवृत्त .’ ज्योतिषशास्त्राचा ओनामा’ , मेष ते मीन लग्न , या ग्रंथाचे संपादक व लेखक ज्योतिष विषयक मासिकातून सातत्याने अभ्यासप्रचुर लेखन, दिवाळी अंकातून वार्षिक भविष्य, सांगली येथील पारंपारिक ज्योतिष सामेलानाचे तसेच डोंबिवली व पुणे येथील कृष्णमूर्ती संमेलनाचे संमेलनाध्यक्ष , राष्ट्रगौरव, यशदीप आदि पुरस्कार , ज्योतिष शिरोमणी, ज्योतिषाचार्य / ज्योतिष वाचस्पती इ. पदव्यांनी सन्मानित व अनेक संस्थांकडून गौरव. ’ज्योतिष ओनामा’ या दिवाळी अंकाचे संपादक. तर्कशास्त्रावर आधारित स्वयंविकसित ‘पॉईंट सिस्टीम’चे जनक, मेडिकल अॅस्ट्रोलॉजीवर विशेष संशोधन. सध्याचे विद्यमान अध्यक्ष व संचालक. |
Past Presidents
कै. पं. रघुनाथशास्त्री मोरेश्वर पटवर्धन संस्थापक चालक व प्रधानाध्यापक ज्योतिष शिक्षण महाविद्यालय, पुणे १९१२ पासून ज्योतिष क्षेत्रात कार्यरत. मे १९६३ मध्ये सुवर्ण महोत्सव संपन्न झाला. लोकमान्य टिळक प्रणीत शुद्ध पंचांगाची निर्मिती, अनेक ग्रंथाचे लेखक, ज्योतिष कौस्तुभ या ग्रंथाचे संपादक-फल ज्योतिष अभ्यास मंडळ, या संस्थेचे पहिले अध्यक्ष. ज्योतिषशात्राच्या प्रगती साठी विशेष कार्य. |
|
कै. पं. श्रीकृष्ण अनंत जकातदार फल ज्योतिष अभ्यास मंडळ , वराहमिहीर मुक्त विद्यापीठ, अखिल भारतीय ज्योतिर्विद महासंघ, पं दादासाहेब जकातदार प्रतिष्ठान या संस्थांचे संस्थापक अनेक ज्योतिष विषयक पुस्तकांचे, ग्रंथाचे लेखक, ज्योतिष परिषद व अधिवेशनाचे आयोजक , प्रेरणास्त्रोत, ’ज्योतिष समाचार’ मासिकाचे संपादक, पोस्टल ट्युशन कोर्से चे आद्य जनक, फल ज्योतिष शास्त्रात विशेष संशोधन. अनेक सामाजिक / शासकीय व ज्योतिष संस्थांकडून गौरवास पात्र. |
|
डॉ. वासुदेव लक्ष्मण मंजुळ भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत ४० वर्ष ग्रंथपाल व संशोधक म्हणून सेवा रुजू, सध्या विश्वस्त पदावरून कार्यरत , संस्कृत भाषेवर प्रभुत्व, अनेक ग्रंथाचे संपादक व लेखक, १२ हजार हस्तलिखितांची ग्रंथसंपदा समृद्ध केली.४००० वैदिक विषयांवर संशोधनात्मक लिखाण, मॉरीशस व मॉस्को येथील आंतरराष्ट्रीय परीषदातून रामायण व ज्ञानेश्वरीवर विशेष योगदान, आदर्श / आस्थेवाईक ग्रंथपाल पुरस्कार, पं श्रीकृष्ण जकातदारांचे जवळचे स्नेही, अनेक ज्योतिष परिषदांमधून गौरव/सन्मान. |